33 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरक्राईमनामाराहुल गांधींच्या विरोधात 'सावरकर' न्यायालयात

राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात

वीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील विधानावरुन हा खटला दाखल केला आहे

Google News Follow

Related

राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे राहुल गांधी पुन्हा मानहानीच्या कचाट्यात सापडले आहेत. राहुल गांधींविरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा करण्यात आला आहे.

वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. ब्रिटनमधील विधानावरुन हा खटला दाखल केला आहे.राहुल यांनी सावरकरांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचे सात्यकी यांचे म्हणणे आहे. मानहानीच्या खटल्यामुले राहुल गांधी यांना यांनी यापूर्वीच आपले संसद सदस्यत्व गमवावे लागले आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याच्या आधारे सात्यकी सावरकर यांनी पुण्यात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की ते आणि त्यांचे पाच सहा मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद सावरकरांना होत होता. तर या सर्व गोष्टीला भित्रेपणा म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ही त्यांची आणि आरएसएसची मेंन्टॅलिटी असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाच्या विरोधात बदनामीची फौजदारी तक्रार सात्यकी सावरकर यांनी दाखल केली आहे.

सात्यकी सावरकर यांनी ही कहाणी राहुल गांधी यांची रचलेली कथा असल्याचे सांगत सावरकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. सावरकरांनी आपल्या ५ ते ६ मित्रांच्यामदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. परंतु, राहुल गांधींनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून केवळ काल्पनिक आहे असल्याचे सत्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी खोटा किस्सा सांगून सावरकरांची बदनामी आणि अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकरांविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकले आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता, त्यामुळे राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत असे सत्यकी सावरकर यांनी म्हटले आहे. सत्यकी सावरकर म्हणतात की, त्या सगळ्या भाषणामध्ये सावरकरांना ओढून – ताणून आणायचे काही कामच नव्हते. राहुल गांधी जो कोणता प्रसंग सांगत आहेत तो काल्पनिक आहे. सावरकरांसारखा मोठा माणूस असे लिखाण करुच शकत नाही. त्यामुळे हा सर्व प्रसंग खोटा आहे. आणि त्याच्याविरोधात काहीतरी केलं पाहिजे.

हे ही वाचा:

एलआयसीने घेतले अदानी कंपनीत आणखी शेअर्स, काँग्रेसचा तीळपापड

आरे-बीकेसी नंतर आता मेट्रो ३ वरळीपर्यंत धावणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’

केशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

मानहानीच्याच खटल्यात खासदारकी गमावली

यापूर्वी सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने २३ मार्च रोजी राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्या मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीशी संबंधित होते. शिक्षा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले. याचा अर्थ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याशिवाय राहुल गांधी आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.

काय विधान केले होते ?

‘सर्व चोरांचे मोदी हे आडनाव कसे काय असू शकते ? असे विधान राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी केले होते. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करताना हे विधान केले होते. त्यानंतर राहुल यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा