पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. पुण्यातील दोन शार्प शूटर या हत्याकांडाशी संबंधित असल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सिद्ध मुसेवाला हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शार्प शूटरपैकी दोन महाराष्ट्रमधील पुण्यातील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मारेकयाला हरियाणातून अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत हरियाणातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सौरभ महाकाळ हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी
लेडी सचिन तेंडूलकरची क्रिकेटमधून निवृत्ती!
बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल
मुसेवाला हत्याकांडात सौरभ महाकाळची भूमिका काय होती हे आतापर्यंत स्पष्ट झाले नसले तरी त्याच्या अटकेनंतर अनेक गुपिते उघड होऊ शकतात. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. त्या यादीत संदीप ऊर्फ केकरा, मनप्रीत सिंग ऊर्फ मन्नू, मनप्रीत भाऊ , शाराज मिंटू, प्रभू दीप सिद्धू ऊर्फ पब्बी, मोनू डागर, पवन बिश्नोई, नसीब यांचा समावेश आहे. राजवीर सोपू याचादेखील नावाचा समावेश आहे. दरम्यान, सीबीआयने गोल्डी ब्रार विरोधात रेड कॉर्नर नोटीस का जारी केली नाही हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेले नाही.