मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खोक्या भोसले हा आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आहे. आता अटक केल्यानंतर प्रयागराजहून सतीश भोसले याला बीडकडे आणले जात आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, खोक्या हा काही दिवसांपासून फरार होता. शिवाय त पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते.
हे ही वाचा :
३० दिवसांच्या युद्धबंदी कराराला युक्रेनची सहमती; रशिया काय निर्णय घेणार?
डलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो
जाफर एक्सप्रेस अपहरण: १६ अपहरणकर्त्यांचा खात्मा; १०४ प्रवाशांची सुटका
त्या योद्ध्याला नमन, जो शरण गेला नाही तर मृत्यू स्वीकारला!, विकी कौशलची मानवंदना
माहितीनुसार, सतीश भोसले याला अटक झालेली असून प्रयागराज पोलिसांच्या सहाय्याने बीड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. अखेर प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक झाली. गेल्या आठवड्यापासून खोक्या हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला लवकरच आता बीडमध्ये आणले जाणार आहे.