ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

गुन्हे शाखेकडून अटक

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे झाले आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुन्हा मोठी कारवाई केली असून पुणे पोलिसांनी ससून मधील आणखी एकाला अटक केली आहे. महेंद्र शेवते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ससून रूग्णालयामधील कर्मचारी आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि पोलीस दलावर जोरदार टीका झाली होती. ललित पळून जाण्यास मदत करण्यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, शेवते हा कारागृहातून ससून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. शिवतेला अटक केल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना ललित पाटीलची सगळी कामे शेवते बघत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

हार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल

याशिवाय ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोघांचे नाव असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.

Exit mobile version