27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामासरस्वती वैद्यचे अवयव कुटुंबियांकडे सोपवले, झाले अंत्यसंस्कार

सरस्वती वैद्यचे अवयव कुटुंबियांकडे सोपवले, झाले अंत्यसंस्कार

Google News Follow

Related

मनोज साने या नराधमाने त्याची पत्नी सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते उकळले तसेच भाजल्याचे उघड झाले. त्यानंतर या अवयवांचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हे सर्व अवयव सरस्वतीच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आल्यानंतर तातडीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नया नगर पोलिसांनी गुरुवारी जे. जे. रुग्णालयाला पाठवलेल्या सरस्वती वैद्य हिच्या अवयवांचे रुग्णालयातील डॉक्टरांनी विच्छेदन केले. तसेच, वैद्य हिचे डीएनएचे नमुने आणि तिच्या तीन मोठ्या बहिणींचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. ३४ वर्षीय सरस्वतीचे अवयव मिरा रोडमधील गीता आकाशदीप इमारतीमध्ये सापडले होते. या हत्येप्रकरणी ५६ वर्षीय मनोज साने याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. ही हत्या ४ जून रोजी झाल्याचा अंदाज आहे. सानेने मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कूकरमध्ये शिजवले. तसेच, दुर्गंधी येऊ नये म्हणून काही अवयव भाजल्याचेही समोर आले आहे.

 

गेल्या १० वर्षांपासून लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहणाऱ्या सरस्वतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा दावा मनोज याने केला आहे. तसेच, तिच्या हत्येप्रकरणी अटक होऊ नये म्हणून त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली त्याने दिली आहे. सरस्वतीच्या अवयवाचे आणि केसांचे नमुने शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले होते. हे सर्व अवयव तिच्या बहिणींकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रे रोड येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
पोलिसांनी सोमवारी मिरारोडच्या इमारतीमधील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज सानेला नेले. तिथेच सरस्वतीचे अवयव पोलिसांना सापडले होते. साने आणि वैद्य हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये राहात होते.

हे ही वाचा:

‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

कोविन ऍपमधून लोकांची माहिती फुटल्याचे वृत्त खोटे!

आदल्या दिवशी पोलिसांनी जवळच्या नाल्यामध्येही काही अवयवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुतेक अवयव फ्लॅटमधून जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले. इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चित्रिकरणानुसार, साने याच्या हालचाली रात्रीच्या वेळी संशयास्पद वाटत होत्या. साने याने काळ्या प्लास्टिकच्या पिशवीतून काही अवयव नेऊन ते नाल्यात फेकल्याचा संशय आहे. मांसाचा दुर्गंध येणारी काळी पिशवी त्याच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा