पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आणखी एका संशयित आरोपीच्या मुसक्या पुणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. मूसेवाला हत्येप्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील कच्छ येथून संतोष जाधव याला अटक केली आहे. तसेच संतोष जाधव सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना २० जून पर्यंत सुनावण्यात आली आहे.
शूटर संतोष हा मूसेवाला हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. मूसेवाला प्रकरणात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू
शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक
‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’
पंजाबमधील आप सरकारनं ४२४ जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली.