मुंबई महानगरपालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावून शुक्रवार, ३० जुलै रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संजीव जयस्वाल ईडीसमोर हजर झाले होते. यावेळी ईडीने त्यांची १० तास चौकशी केली.
संजीव जयस्वाल हे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. कथित कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी त्यांची ईडीने तब्बल १० तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रात्री १० वाजता जयस्वाल यांना सोडण्यात आले.
ईडी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. जे विचारले गेले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यापूर्वी बोलावले होते. मात्र, तेव्हा प्रकृती ठीक नसल्याने हजर राहता आले नाही. चौकशीसाठी पुन्हा बोलावले नाही. मात्र, बोलवले तर पूर्ण सहकार्य करणार आहे.”
आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना ईडीने २२ जून रोजी समन्स बजावले होते. कोविड घोटाळा प्रकरणात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, संजीव जयस्वाल तेव्हा ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. त्यामुळे ईडी लवकरच त्यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार ईडीने संजीव जयस्वाल यांना शुक्रवारी पुन्हा समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
बुधवार, २१ जून रोजी ईडीने मुंबईत आणि पुण्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती असलेल्या लोकांवर १५ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती.
हे ही वाचा:
ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र; करोना काळातील खर्चांचे तपशील मागविले
समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ प्रवशांचा होरपळून मृत्यू
भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले
…हा तर स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी मुंबई महापालिकेवर मोर्चा
सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीर कंत्राट देण्यात आलं होतं. ते संजय राऊत यांचे खास असून त्यांच्या आशीर्वादानेचं त्यांना कंत्राट मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते.