मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. त्यानंतर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळीतील १ हजार ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सहभाग असून तेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.
हे ही वाचा:
धनुष्यबाण गोठवल्यावर काय म्हणाले संजय राऊत?
निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत हे कोठडीत आहेत. खासदार संजय राऊत हे सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हेच मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे.