पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या पार्टनरला अटक

पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या पार्टनरला अटक

पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राजीव साळूंखे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.

राजीव साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजीव साळूंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विटर वरुन माहिती दिली आहे. तसेच सुजित पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा यांना अटक होणे बाकी असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा वाद चर्चेत आला होता. या कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी मुंबई पोलिसांनी लाईफलाईन कंपनीच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

‘बारसूत रिफायनरीच्या जागेवर शेती नाही, घरे नाहीत, लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न नाही’

या घोटाळ्यामुळे तीन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. संजय राऊत यांचा साथीदार सुजीत पाटकरचा हा घोटाळा मी उघडकीस आणला होता, असे किरीट सोमय्या म्हणाले.

Exit mobile version