24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामासंजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त

संजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने पत्राचाळ कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात केली कारवाई

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू आणि निकटवर्ती प्रवीण राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ७३ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तेत संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांच्या जमिनींचा समावेश आहे. यात पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरातील जमिनींचा समावेश आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी ईडीने प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पत्राचाळ कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीने प्रवीण राऊत यांच्यासह इतर भगिदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे. ईडीने ७३.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ११६.२७ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएमएलए कायदा २००२ च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकसकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली होती. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहे.

हे ही वाचा:

बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही

“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”

शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू

आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकरणाच्या आधारवर ईडीने तपासाला सुरूवात केली आहे. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊत यांच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांच्या जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य यांच्या विविध खात्यांमध्ये वळती केली आहे. खासदार संजय राऊतही या प्रकरणी रडारवर असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा