खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बोलावणे

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

मुंबई महानगर पालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजाविण्यात आले असून शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांना तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

महानगर पालिकेने कोविड-१९ साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांना ‘खिचडी’ वाटपाचे कंत्राट देताना आर्थिक घोटाळा प्रकरणाची चौकशी करणारे मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून मागील महिन्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

सिक्कीमच्या पुरात १४ जणांचा मृत्यू; १०२ जण बेपत्ता

मैदानासमोर कचरा टाकल्याने नागरिकांना मनस्ताप

या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. या घोटाळ्यात शिवसेना (उबाठा) नेते संजय राउत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांचा समावेश आढळून आल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी संदीप राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.संदीप राऊत यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीकामी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्यास कळविण्यात आले आहे.

Exit mobile version