शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली संजय राऊतांना ५ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजय राऊत हे सध्या आर्थर रोड तुरुंगात असून आज, २२ ऑगस्ट रोजी त्यांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यानंतर त्यांना आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी १० वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता जे जे रुग्णालयातनेण्यात आलं होतं. ही तपासणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे आता ५ सप्टेंबरपर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ईडीने त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ईडीच्या विशेष न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
२० जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी पुढची तारीख मागितली होती. मात्र, त्यांचा अपील त्यावेळी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ईडीने नवीन समन्स जारी करून राऊत यांना २७ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते.