कैदी नंबर ८९५९ अर्थात संजय राऊत

कैदी नंबर ८९५९ अर्थात संजय राऊत

ईडीकडून मनी लौड्रिंगच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन तर शिवसेनेच्या एका नेत्याला अटक झालीय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक सध्या आजारी असल्याने कुर्ल्यातील क्रीटी केअर रुग्णलयात उपचार घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते खाजगी रुग्णालयात ऍडमिट आहेत. मात्र अनिल देशमुख आणि संजय राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेतच आहेत.या तीनही नेत्यांना ऑर्थर रोड कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत शिवाय त्यांना टीव्ही,कॅरम,पुस्तके आणि कॅन्टीनमधील गरजेच्या गोष्टी मिळत असतात. या तिन्ही कैद्यांचा दिनक्रम कसा असतो त्याविषयी.

संजय राऊत – कैदी नंबर – ८९५९

संजय राऊत यांना १ ऑगस्टला गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आली. ८ ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. सध्या राऊत ऑर्थर रोड कारागृहात असून त्यांचा कैदी नंबर ८९५९ असा आहे. राऊत यांनी जेल प्रशासनाने त्यांच्या मागणीनुसार वही आणि पेन दिलेलं आहे ते भरपूर वाचन करतात. जेलमध्ये असणाऱ्या ग्रंथालयातील पुस्तके ते वाचायला घेतात अशी माहिती सूत्रांनी दिलीय. ते जरी लिहीत असले तरी त्यांच लिखाण हे जेलच्या चार भिंतीच्या आतमध्येच राहत ते बाहेर येऊ शकत नाही. राऊत यांना सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलंय. त्यांना टीव्ही देण्यात आलेला आहे. ते बातम्यांवर आपलं लक्ष ठेवतात विशेष म्हणजे संजय राऊत यांना इतर कैद्याप्रमाणे कॅरमही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय…

अनिल देशमुख – कैदी नंबर – २२२५

अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या मनी लौड्रिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलीय. गेल्या ९ महिन्यापासून अनिल देशमुख अटकेत आहेत. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर देशमुखांनी घरच जेवण मिळावं म्हणून कोर्टात अर्ज केला होता मात्र कोर्टाने तो मान्य केला नाही. देशमुख यांना जेलमधीलच जेवण खावं लागत. कोर्टाच्या परवानगीने त्यांना बेड देण्यात आलाय. तेही दिवसभरात जास्तीत जास्त वेळ बातम्याच बघत असतात अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यांनाही सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलंय शिवाय टीव्ही आणि कॅरम देण्यात आलाय.

नवाब मलिक – कैदी नंबर – ४६२२

नवाब मलिक यांनी डी गँगशी व्यवहार करून मनी लौड्रिंग केली या आरोपाखाली त्यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. २३ फेब्रुवारीला नवाब मलिक यांना ईडीने अटक केली तेंव्हापासून ते कैदेत आहेत. मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना खाजगी रुग्णलयात उपचार घेण्याची परवानगी कोर्टाने दिलीय. त्यानुसार गेल्या २ महिन्यापासून ते कुर्लामधील क्रीटी केअर रुग्णालयात ऍडमिट आहेत. नवाब मलिक यांना कोर्टाने ऑर्थर रोड कारागृहात बेड आणि खुर्ची वापरण्याची मुभा दिली होती शिवाय त्यांना घरचे जेवण घेण्याचीही परवानगी देण्यात आलीय. त्यांनाही ऑर्थर रोड कारागृहात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून टीव्ही, कॅरम, पुस्तके अश्या गोष्टी देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

‘सीएनजी’चा तुटवड्यामुळे प्रवाशांचा पंपावर खोळंबा

चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा

‘पाच वर्षाची काम अडीच वर्षात करणार’

उद्धव ठाकरे यांची स्वतःच्या आमदारकीच्या राजीनाम्यालाच स्थगिती

 

जेलमधील प्रत्येक कैद्याला आता महिन्याला ६ हजार रुपये मनी ऑर्डर करता येतात. त्या ६ हजार रुपयांमध्ये कॅन्टीनमधील गरजेच्या गोष्टी कैदी खरेदी करू शकतो. तेवढेच पैसे देशमुख आणि संजय राऊत यांनी मिळत आहेत..

Exit mobile version