संजय पांडेंचा परमबीर सिंहांची चौकशी करण्यास नकार

संजय पांडेंचा परमबीर सिंहांची चौकशी करण्यास नकार

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

माझ्याहून एक वर्ष आणि दोन वर्ष ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदं दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही कार्यवाहक पोलीस महासंचालक बनवू शकत नाही. यूपीएससीला माझी फाईलच पाठवली नाही, हे सर्वच मी त्या पत्रात लिहिलं आहे. तसेच आता मी राज्य सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

अजून २-३ महिने लसींचा तुटवडा

गोव्यात लॉकडाऊन नाही, मात्र आठ दिवस निर्बंध कायम

ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांकडून रश्मी शुक्लांचा छळ

ममतांच्या पराभवाने कार्यकर्ते पिसाळले, सुवेंदू अधिकारींवर हल्ला

बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याआधी एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असंही त्यांनी याआधी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

Exit mobile version