28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणी संजय दत्त, सुनील शेट्टी ईडीच्या रडारवर

ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणी संजय दत्त, सुनील शेट्टी ईडीच्या रडारवर

कलाकारांच्या नावाची यादी आली समोर

Google News Follow

Related

महादेव ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक सध्या ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे. रणबीर कपूर, कपिल शर्मा, हिना खान आणि हुमा कुरेशी यांना ईडीने यापूर्वी समन्स पाठविले असून आता आणखी नव्या कलाकारांची यादी समोर आली आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. १८ सप्टेंबरला युएईमध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि सक्सेस पार्टी मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या यादीत संजय दत्त, सुनील शेट्टी यांचाही समावेश आहे.

यूएईमध्ये झालेल्या पार्टीत एक युट्यूब इन्फ्लुएंसर सहभागी झाला होता. त्याने आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले. सौरभ चंद्राकर या आरोपीने आपल्या लग्नासाठी २०० कोटी रुपये तर बर्थडे आणि सक्सेस पार्टीसाठी ६० करोड रुपये खर्च केल्याचे तपासात समोर आले आहे.

ईडीच्या रडारवर असलेले कलाकार

  • रफ्तार
  • दीप्ती साधवानी
  • सुनील शेट्टी
  • सोनू सूद
  • संजय दत्त
  • हार्डी संधू
  • सुनील ग्रोव्हर
  • सोनाक्षी सिन्हा
  • रश्मिका मानधना
  • सारा अली खान
  • गुरु रंधावा
  • सुखविंदर सिंग
  • टायगर श्रॉफ
  • कपिल शर्मा
  • नुसरत बरुचा
  • डीजे चेतस
  • मलायका अरोरा
  • नोरा फतेही
  • अमित त्रिवेदी
  • मौनी रॉय
  • आफताब शिवदासानी
  • सोफी चौधरी
  • डेझी शाह
  • उर्वशी रौतेला
  • नर्गिस फाखरी
  • नेहा शर्मा
  • इशिता राज
  • शमिता शेट्टी
  • प्रीती झांगियानी
  • स्नेहा उल्लाल
  • सोनाली सहगल
  • इशिता दत्ता
  • एलनाझ
  • ज्योर्जिओ ऍड्रियानी

महादेव गेमिंग ऍपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रणबीर कपूर, कपिल शर्मा, हिना खान आणि हुमा कुरेशी यांना ईडीने यापूर्वी समन्स पाठविले आहे. तर, महादेव बेटिंग ऍप प्रकरणी ईडीने मुंबईतील कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला होता. कुरेशी प्रोडक्शन हाऊसने चित्रपट बनवण्यासाठी महादेव ऍपचे फाऊंडर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून हवाला पैसे घेतले होते. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने चार जणांना अटक केली आहे. सुनील दममानी, अनिल दममानी, चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हे ही वाचा:

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

भारतातील जनता इस्रायलच्या बाजूने

मनी लाँड्रिंग प्रकरणी व्हिवोच्या अधिकाऱ्यांना अटक

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

महादेव ऍपचे संस्थापक असे चार ते पाच ऍप्स चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ऍपचे कॉल सेंटर आहे. श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये ऍपचे कॉल सेंटर आहेत.

प्रकरण काय?

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा