कुठे आहे कायदा सुव्यवस्था? नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या

कुठे आहे कायदा सुव्यवस्था? नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या

नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार धक्कादायक घटना घडल्यावर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संजय यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. बियाणी यांच्या चालकावर उपचार सुरू आहेत. बियाणी यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शहरात तणावग्रस्त वातावरण असल्याने नांदेडमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला.

अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ शोध लावण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक

अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरातील गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी असे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version