देशासह राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील बोपदेव घाटातील २१ वर्षीय तरुणीवर अत्याचारची घटना ताजी असताना सांगलीमधुन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सांगलीतील संजय नगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
राहुल कांबळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने एका ९ वर्षीय मुलीला ब्ल्यू फिल्म दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच रास्तारोको करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली. तसेच आरोपीने ज्या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला, त्या सार्वजनिक शौचालयाची देखील तोडफोड केली.
हे ही वाचा :
दुर्गाष्टमीचा पूजापाठ पोलिसांनी घरात घुसून केला बंद, स्थानिकांकडून संताप!
‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’
ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट
काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे
सदर घटनेची माहिती समजतात सांगलीतील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे आपल्या फौजफाटासहीत घटनास्थली दाखल झाले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल कांबळे याला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच ही अत्याचाराची केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी, या आरोपी सोबत आणखीन कोण आहे का? याचीही माहिती पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी राहुल कांबळेला अटक करून त्याच्यावर बलात्कार, अत्याचार यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.