सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार झाला असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. हल्लेखोर सध्या फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. गोळीबाराच्या घटनेने सांगली शहर पुन्हा एकदा हादरले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.सांगली शहरातील १०० फुटी रोड येथे ही घटना घडली.नालसाब मुल्ला हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
आपल्या घराच्या बाहेर ते बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी योग्य संधी साधत मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
सांगली पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ते म्हणाले शनिवारी संद्याकाळी ८.३० च्या दरम्यान विश्राम बाग पोलीस स्टेशन हद्दी मध्ये राहणारा नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घरी ते घराच्या दारात बसलेले असताना हा हल्ला झाला.
हे ही वाचा:
काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली
चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’
परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!
हल्लेखोरांनी आठ गोळ्या झाडत तसेच धारदार शश्त्रानी वार करत त्याचा खून करण्यात आला. हल्लेखोर अज्ञात असल्याने सखोल चौकशी करत तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच मयत मुल्ला याच्यावर देखील गुन्हे असल्याचे तपासात दिसून आल्याचे, अधीक्षक तेली यांनी सांगितले. हल्लेखोर तीन ते चार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती, तेली यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नसून तपास सुरु असल्याची माहिती अधीक्षक तेली यांनी दिली.
मागील काही दिवसापूर्वी सांगली शहरात भर दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असताना आता पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.