संध्या टोपनो हत्याकांडात आणखी एका आरोपीला अटक

संध्या टोपनो हत्याकांडात आणखी एका आरोपीला अटक

राजधानी रांचीमध्ये गाय तस्करांनी महिला पोलीस अधिकारी संध्या टोपनो यांची वाहनाने चिरडून हत्या करण्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजता ही घडली होती. महिला पोलिसांना चिरडल्यानंतर तस्करांनी वाहनासह पलायन केले. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आता या महिला उपनिरीक्षकाला मारणाऱ्या आणखी एकाची ओळख पटली आहे. साजिद असे या आरोपीचे नाव आहे. एसआय संध्या टोपनो यांना चिरडणाऱ्या वाहनातील तो दुसरा प्रवासी होता.

बुधवार, २० जुलै रोजी सकाळी रांचीच्या तुपुदाना ओपीच्या प्रभारी संध्या टोपनो या वाहनाची तपासणी करत होत्या. त्यावेळी त्यांनी पिकअप व्हॅनला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने संध्याला धडक देऊन पळ काढला. संध्या यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी यांच्यासह अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींचा शोध सुरू केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर बुधवारी सकाळी आरोपीला पकडण्यात यश आले. रांची शहर पोलिस अधीक्षक अंशुमन कुमार यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. ते म्हणाले की, अटक करण्यात आलेली व्यक्ती आणि वाहन तस्करीसारख्या अवैध कामात सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे
दरम्यान या घटनेत सहभागी असलेल्या शाहिद, ताहिर आणि अन्य एका गाय तस्करांना अटक केली आहे. याआधी पोलिसांनी गाडीचा चालक नजीर खान याला घटनेच्या दिवशीच अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता त्याच्या दोन जवळच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

सिमडेगा येथून पळून आले होते प्राणी तस्कर

पशु तस्कर सिमडेगा येथून पिकअप व्हॅनमधून जनावरांची तस्करी करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. याची माहिती सिमडेगा पोलिसांना मिळाली. सिमडेगा पोलिसांनी पिकअप व्हॅनचा पाठलाग केला, मात्र तस्कर वाहनासह पळू लागले. त्यानंतर गुमला कामदरा पोलिसांना माहिती देण्यात आली.

बॅरिकेट तोडून चालक फरार

गुमला पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट लावले होते, मात्र चालकाने ते तोडून पळ काढला.त्यानंतर तोरपा पोलिसांनी लावलेला बॅरिकेटही तोडून त्याने पळ काढला होता.

Exit mobile version