मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी शनिवारी भांडुपमधून दोन जणांना अटक केली आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या नंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगत या हल्ल्याची माहिती दिली. हे सर्व कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे. मी माझं सविस्तर म्हणणं एफआयआरमध्ये सांगितलं आहे. पोलिस तपास करत आहेत. त्यांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. तेव्हा सर्व बाहेर येईल.मी घाबरणार नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये, असे देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आम्ही कोरोना काळातील घोटाळा उघडकीस आणणार होतो. त्याआधीच माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. आता पोलिसांनी मला नाही तर त्यांना सुरक्षा द्यावी. मी कोणाला घाबरत नाही. मी दोन दिवसात नवा घोटाळा बाहेर काढणार होतो, त्याचा सुगावा हल्लेखोरांना लागला असावा. त्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला केला अशी शक्यता संदीप देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केली.
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण? हे पण आम्हाला माहिती आहे. पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे, तो पूर्ण होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी विचारपूस केली. सुरक्षेच्या कारणास्तव २ पोलिस नेमले, परंतु मी कोणाला घाबरत नाही त्यामुळे मी विनम्रपणे सुरक्षा परत करतो असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा:
हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त
गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेलेल्या आरोपीचे नाव अशोक खरात असे आहे. हा आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत जास्त बोलणे टाळले.