राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. त्यावरून पाटील यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असे सांगून त्यांनी माफी देखील मागितली होती. परंतु त्यांच्यावर अचानक शाईफेक करण्याची घटना घडली आहे . पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या शाईफेकच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात झुंडशाही चालणार नाही. हिंमत असेल तर हल्लेखोरांच्या नेत्याने समोर यावे असे आव्हान मंत्री पाटील यांनी दिले आहे.
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्यालाउपस्थित राहणार होते. पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले होते. यावेळी जिने उतरून खाली येत असताना त्यांच्यावर अचानक शाईफेक करण्यात आली. पाटील यांच्या विधाना नंतर असे काही घडून शकेल याची पोलिसांना आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे या कार्यकर्त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण तरीही त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पोलिसांनी फकफादीने काजवाय करत दोन जणांना ताब्यात घेतले. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही समता परिषदेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
हे ही वाचा :
‘लव्ह जिहाद’ कायद्याची पडताळणी सुरु, फडणवीसांची माहिती
‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
ही झुंडशाही सहन करणार नाही
दिलगिरीची व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा केला आहे. हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावे . ही झुंडशाही सहन करणार नाही. आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूट दिली असती तर केवढ्याला पडली असत. पण ती आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. या शाई फेकबद्दल योग्य चौकशी होईल अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. एका गिरणी कामगाराचा पोरगा स्टेजवर आल्याचे यांना झेपत नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.
आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला शिकवले नाही
पोलिसांना सस्पेंड करून मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे करावे म्हणतील ते करा. ते आंदोलन करा म्हणाले, आंदोलन करा. नाही तर नाही. त्यांचे ऐका. डॉ. आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला शिकवले नाही. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच सांगणार नाही. कारण त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. असल्याची टीका पाटील यांनी केली.