वानखेडेंच्या सहकाऱ्याने ३० लाखांचे घड्याळ चोरले?

ब्रिटिश नागरिक करणं संजानीचा आरोप

वानखेडेंच्या सहकाऱ्याने ३० लाखांचे घड्याळ चोरले?

अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिकाने खळबळजनक आरोप केला आहे. वानखेडे यांचा जवळचा सहकारी आणि गुप्तचर अधिकारी आशीष रंजन याने त्याचे रोलेक्स डेटोने हे ३० लाख किमतीचे घड्याळ चोरल्याचा आरोप केला आहे.

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. या प्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

समीर वानखेडे यांनी जानेवारी २०२१मध्ये ब्रिटिश नागरिक असणाऱ्या करण संजानी याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तेव्हा तो कोठडीत असताना वानखेडे यांचा जवळचा सहकारी आणि गुप्तचर अधिकारी आशीष रंजन याने त्याचे रोलेक्स डेटोना हे ३० लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप करणने केला आहे.

वानखेडे यांच्याजवळ असलेल्या एका महागड्या घड्याळाबाबतही अमली पदार्थ विरोधी पधकाच्या दक्षता पथकाकडूनही चौकशी सुरू आहे. मात्र स्वत: वानखेडे याबाबत स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत. याचा उल्लेख वानखेडे यांच्याविरोधात केलेल्या भ्रष्टाचार आणि खंडणी प्रकरणातील एफआयआरमध्येही करण्यात आला आहे.

‘या प्रकरणातील तपास अधिकारी आशीष रंजन याने माझे ३० लाख किमतीचे डेटोना रोलेक्स हे घड्याळ जप्त केले. मात्र जप्त वस्तूंच्या यादीत त्याचा उल्लेख केला नाही,’ असा आरोप करणने केला आहे.

हे ही वाचा:

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार

देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांना आणले कोणी?

आर्यन खान प्रकरणातील एफआयआरमध्ये नाव असलेले के. पी. गोसावी किंवा सॅनव्हिले डिसोझा यांना समीर वानखेडे ओळखतात का, असा प्रश्न करणला विचारण्यात आला. तेव्हा ‘ जानेवारी २०२१मध्ये वानखेडे यांच्या टीमने माझ्या घरावर छापा टाकला तेव्हा ते दोघेही वानखेडे यांच्यासोबत होते,’ अशी माहिती त्याने दिली.

संजानी याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्यासह अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Exit mobile version