एनसीबीने दाखविला विश्वास
गेले काही दिवस महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे लवकरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदल होणार असल्याची चर्चा होती, पण तसे काहीही होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. समीर वानखेडे हे कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणाच्या चौकशीत कायम राहतील. त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने स्पष्ट केले आहे. एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर विभाग) ज्ञानेश्वर सिंह यांनी हे स्पष्ट केले आहे.
ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांचे पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी समीर वानखेडे यांची चौकशी केली. साडेचार तास झालेल्या या चौकशीत कोणताही ठोस असा पुरावा वानखेडे यांच्याविरोधात सापडला नाही, असे एनसीबीने स्पष्ट केले आहे. समीर वानखेडे यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. आवश्यकता भासली तर त्यांच्याकडून अधिक कागदपत्रे मागविली जातील.
या पाच सदस्यांच्या समितीने समीर वानखेडे यांच्या केलेल्या चौकशीबरोबरच क्रूझ प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे, पण हे दोघेही एनसीबीसमोर आलेले नाहीत. आणखी दोन दिवसांचा अवधी त्यांनी दिलेला आहे.
हे ही वाचा:
चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज
आव्हाड क्रांति रेडकरना म्हणतात, सांभाळून बोला, इतिहास काढला तर हमाम मे सब नंगे!
साईल, गोसावीची वाट पाहाताहेत एनसीबीवाले!
प्रभाकर साईलने आपल्या व्हीडिओत असे म्हटले होते की, २५ कोटींची डील झाली असून ८ कोटी देण्यासंदर्भात ऐकल्याचे समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणात म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.