समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!

सीबीआयने केले आरोपपत्र दाखल

समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. एनसीबीचे मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर दोन अधिकार्‍यांवर अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयने नोंदवलेल्या पहिल्या अहवालानुसार, क्रूझ ड्रग्स प्रकरणातील एका स्वतंत्र साक्षीदाराने आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यातील ८ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असं साईल यांनी सांगितलं होतं. याची दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सीबीआयने छापेमारी केली. तर, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याची कहाणीही दाखवा’

“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”

दंगल घडविण्यामागे कुणाची तरी फूस, आम्ही अद्दल घडवू!

परीक्षेत नापास झाल्यामुळे तिने अपहरणाचे नाट्य रचले!

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या घरावर शुक्रवारी छापे मारल्यानंतर ‘मी देशभक्त असण्याची शिक्षा भोगतोय,’अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली. सीबीआयला समीर यांची बहीण यास्मिन वानखेडे आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून २८ हजार रुपये सापडले. तर, सासऱ्यांच्या घरातून १८०० रुपये सापडले.

Exit mobile version