एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी निकाह का केला याबाबत आपले मत प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. ‘भारत हा पुरोगामी देश आहे. त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लिम होती. बाबा हिंदू आहेत आणि मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लिम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला. तो मी केला, कारण मी आईचा शब्द पाळला कोणताही गुन्हा केलेला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत मी नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीय. माझे बाबा ज्ञानदेव वानखेडे स्पेशल मॅरेज ऍक्टच सर्टिफिकेट समोर ठेवतील असे समीर वानखेडे यांची ‘साम’शी बोलताना सांगितले.
दरम्यान समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी या प्रकरणाबद्दल वक्तव्य केले आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचे सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. तसेच निकाहावेळी समीर वानखेडे यांनी आपले नाव समीर दाऊद वानखेडे असेच सांगितले होते, असेही मौलाना म्हणाले.
हे ही वाचा:
‘मला कुणी दाऊद हाक मारत असेलही, पण मी मागासवर्गीयच आहे’
‘नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ’
हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!
‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’
मुलगा- मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितले जाते की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचे वडील मुसलमान आहेत की नाही, नंतरच निकाह केला जातो. आधीच माहिती घेतली जात नाही. माहिती तर त्याने घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढचं बघतो की, मुलगा- मुलगी मुसलमान आहेत की नाही आणि ते असतील, राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले. या सर्व स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाला कुठले नवीन वळण मिळते यावर सर्वांचेच लक्ष असेल.