27 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरक्राईमनामासंभल वीजचोरी: खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी, दोन मदरशांसह १,४०० एफआयआरची...

संभल वीजचोरी: खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी, दोन मदरशांसह १,४०० एफआयआरची नोंद

उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ११ कोटींचा दंड वसूल

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हिंसाचार भडकला होता. यानंतर या भागात वीज विभागाने आपल्की कारवाई तीव्र करत वीजचोरीची अनेक प्रकाराने उघडकीस आणली होती. या झोनमध्ये सर्वाधिक वीजचोरीची प्रकरणे ही संभल जिल्ह्यातून नोंदवली गेली आहेत. यात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घराचा समावेश असल्याचे समोर आले होते. याशिवाय आता आणखी काही मशिदी, मदरसे यांचाही यात समावेश असल्याचे उघड झाले आहे. यानंतर आता वीज विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभल येथे हिंसाचार भडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शहरातील सदर तहसील परिसरात अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीर वीज जोडणी शोधून दंड आकारण्याची मोहीम तीव्र केली आहे. वीज चोरीच्या कलम १३५ अंतर्गत संभलमध्ये १,४०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी आणि दोन मदरशांसह अनेक इतर व्यक्ती आणि संस्थांचा समावेश आहे. वीज चोरीप्रकरणी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (UPPCL) ११ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना लदानिया मशिदीच्या छतावर एक बेकायदेशीर पॉवर सेटअप सापडला, जो सुमारे १०० घरांना वीज पुरवत होता. संभल एसएम राजेंद्र पेन्सिया आणि एसपी पोलिस कृष्ण कुमार बिश्नोई यांनी या छाप्याचे नेतृत्व केले आणि २० घरे आणि चार धार्मिक स्थळांमधील वीजचोरी उघडकीस आणली. बेकायदेशीर वीज पुरवठ्यासाठी शुल्क वसूल केल्याचे आढळून आल्यास आरोपींविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत संभाव्य आरोपांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

घरात शिरलेल्या चोराने अभिनेता सैफ अली खानवर केला चाकू हल्ला

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!

चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी

छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’

खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावरही वीज विभागाने छापा टाकला होता. तसेच वीज चोरीची बाब समोर येताच वीज विभागाने वीजचोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता आणि १.९१ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. घराची वीजही खंडित केली होती. यासोबतच खासदाराच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी वीज कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा