समाजवादी पक्षाचे (एसपी) माजी राज्य सचिव वीरेंद्र बहादूर पाल यांच्यावर सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या महिला वकिलावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (८ सप्टेंबर) उत्तर प्रदेशातील मऊ पोलिसांनी महिला वकिलाच्या तक्रारीच्या आधारे सपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी वीरेंद्र बहादूर पाल हा समाजवादी पक्षाचे माजी आमदार दयाराम पाल यांचा मुलगा आहे. तसेच त्याने मऊ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
वृत्तानुसार, पीडित महिलेने मऊ पोलिसात तक्रार दाखल केली असून वीरेंद्र बहादूर पाल यांनी तिला दारू पिऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्याने या कृत्याचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि त्याचा वापर करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे तक्रारीत महिलेने म्हटले आहे. तसेच आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पिडीत महिलेने म्हटले आहे.
हे ही वाचा :
शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन
सोनसाखळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
दिल्लीत दुचाकीस्वाराकडे सापडली ४९९ जिवंत काडतुसे
सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र बहादूर पाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपींला पकडण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.