28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामावादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूहल्ला

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूहल्ला

सॅटेनिक व्हर्सेसचे प्रख्यात लेखक

Google News Follow

Related

सॅटेनिक वर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला. एका व्याख्यानासाठी ते जाणार असताना एका माणसाने मंचावर धावत जाऊन रश्दी यांना ठोसे लगावण्यास आणि चाकूने भोसकण्यास सुरुवात केली. या सगळ्या हाणामारीत रश्दी खाली कोसळले आणि त्या हल्लेखोराला पकडण्यात आले.

रश्दी यांची प्रकृती कशी आहे हे त्यावेळी कळले नव्हते पण त्यांच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यांना विमानाने हॉस्पिटलला नेण्यात आले.

न्यूयॉर्क पोलिसांनी म्हटले आहे की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, रश्दी यांच्या मानेवर सुऱ्याने मारल्याचे वार आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरने हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. त्यांनी स्थिती कशी आहे हे कळलेले नाही. त्यांची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला थोडी जखम झाली आहे.

हे ही वाचा:

म्हणून त्या प्रियकराने प्रेयसीला खाडीत ढकलले

मुंबई अग्निशमन दलात प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांना बढती

दहशतवादाला चीन घालतोय खतपाणी

म्हणून त्या प्रियकराने प्रेयसीला खाडीत ढकलले

 

सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे रश्दी हे जगभर लोकप्रिय झाले. १९८८मध्ये या पुस्तकावर बंदी आणण्यात आली. त्यावेळी भारतातही या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. तेव्हा राजीव गांधी यांचे काँग्रेस सरकार भारतात होते. त्यानंतर वर्षभराने इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना मारण्यासाठी फतवा काढला. ३० लाख डॉलर इतके इनाम ठेवण्यात आले होते. इस्लामी देशांनी त्यांच्या या पुस्तकावर टीका केली होती. इस्लामची निंदा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

उदयपूर, राजस्थान येथे झालेली कन्हैय्याकुमारची हत्या, कमलेश तिवारीचा खून, अमरावतीत उमेश कोल्हेची झालेली हत्या अशाच इस्लामी कट्टरवादातून झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा