बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. या प्रकरणी पत्रकाराने सलमान खान विरोधात मारहाणीचा आरोप केला होता .
पत्रकाराला २०१९ मध्ये मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गिरुवारी दिले आहेत.त्यामुळे आता सलमान खानला अंधेरी न्यायालयात हजर राहावे लागणार नाही.गेल्या वर्षी कनिष्ठ न्यायालयाने सलमान आणि शेख यांना बजावलेले समन्सही उच्च न्यायालयाने रद्द केले. मॅजिस्ट्रेट कोर्टाने मार्च २०२२ मध्ये सलमान आणि शेख यांना ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते
अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी आपल्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. पत्रकार अशोक पांडे याने सर्वप्रथम अंधेरीतील दंडाधिकार्यांकडे तक्रार केली होती . या तक्रारीवर कारवाई करत न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले होते. यानंतर सलमानने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये समन्सला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.५ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयाने सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना समन्सला स्थगिती दिली होती. शेख यांनीही अशीच याचिका दाखल केली होती, त्यानंतर त्यांना बजावण्यात आलेल्या समन्सलाही स्थगिती देण्यात आली होती.
हे ही वाचा:
संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!
बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी
कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका
आपण सलमान खान याच्या सोबत २०१९ मध्ये फोटो काढत असताना सलमानच्या अंगरक्षकांनी आपला फोन हिसकावून मारहाण केली. सलमानने आपल्याला धमक्याही दिल्याचे पांडे याने आपल्या असे फिर्यादीत म्हटले आहे . परंतु गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोप निराधार ठरवत सलमानला क्लीन चिट दिली आहे.