देशासह राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूदरातही वाढ होत आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. अशातच आता बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना अवैध्यरित्या रेमडेसिवीर इंजेक्शन विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून ते रुग्णांना विकलं जात होतं. हा प्रकार समोर आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा
गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा
बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच
राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या प्रमाणात लसींचे डोस पुरवले जात आहेत
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परिणामी या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळा बाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. असं असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे बनावट तर नाही ना? हे नक्की तपासून पहा. कारण बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, यातील एक आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून एक इंजेक्शन २२ हजारांना विकण्याचा प्रयत्न केला आहे.