पाकिस्तानच्या सलीम मलिकची ती ऑफर ऐकून शेन वॉर्न हबकला!

पाकिस्तानच्या सलीम मलिकची ती ऑफर ऐकून शेन वॉर्न हबकला!

शेन वॉर्नला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. वॉर्नचे आत्मचरित्र ‘नो स्पिन’ हे या महिन्यात प्रसिद्ध झाले आहे. आणि त्यातून समोर आलेला सर्वात मोठा खुलासा म्हणजे १९९४ दरम्यानच्या कसोटीत घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १९९४ साली ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.

काय घडलं त्या भेटीत???

आत्मचरित्रात कथन केल्याप्रमाणे, ” या कसोटीत ऑस्ट्रेलियाला आणखी सात विकेट्सची गरज होती. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर चौथ्या दिवसाची कसोटी संपली. आणि त्याच संध्याकाळी सलिम मलिकने वॉर्नला भेटायला बोलवले.

त्या निरोपावरून वॉर्न कराचीमधील एका हॉटेलमध्ये सलीमच्या खोलीत त्याला भेटायला गेला. तेव्हा सलीम वॉर्नला म्हणाला,” आम्ही तुमच्या संघाला हरवू शकत नाही आहे. आणि जेव्हा आम्ही पाकिस्तान मध्ये हरतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहित नाही. आम्ही हरलो तर आमची घरं जळून खाक होतील. तेव्हा सलीमने मला आणि माझ्या टीमला खराब गोलंदाजी करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी ४० लाखांची ऑफर दिली होती. मात्र, मी त्याची ती ऑफर धुडकावून लावली, असे शेन वॉर्नने सांगितले.

हे ही वाचा:

अबब….सूर्यापेक्षा दहापट मोठा तारा फुटला !

बीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!

कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका

चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

काय घडलं त्या सामन्यात???

पाकिस्तानने तो सामना एका विकेटने जिंकला. इंझमाम उल हक आणि ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मुश्ताक अहमदनं ५७ धावांची भागीदारी करत सामना जिंकून दिला. पण शेन वॉर्न १५० धावांच्या बदल्यात घेतलेल्या ८ विकेट्ससाठी सामनावीराचा मानकरी ठरला.

भ्रष्टाचारात मलिकचे नाव येणे हे काही नवीन नाही. १९९५ मध्ये, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉ आणि त्याच्या टिमनेही दावा केला होता की, त्यांना कसोटी गमावण्यासाठी मलिकने मोठ्या रकमेची ऑफर दिली होती.

Exit mobile version