सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असलेला दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम फ्रूटला ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशीदरम्यान चांगलाच पिळून काढला आहे. त्याने त्यातून अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
ईडीच्या तपासात सलीम फ्रुटने खुलासा केला आहे की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि गँगस्टर छोटा शकील पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहतात. मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने दाऊद इब्राहिमच्या अनेक हस्तकांची चौकशी केली आणि या चौकशीदरम्यान छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटची चौकशी केली असता सलीमने गँगस्टर छोटा शकील पाकिस्तानमधील कराचीमध्ये असल्याचे उघड केले आहे.
दाऊदचा भाचा आलिशाह पारकर यानेही दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराचीमध्येच असल्याचा जबाब ईडीला दिला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याची जी चर्चा कायम सुरू होती, तिला पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे.
सलीम फ्रुटने ईडीला सांगितलं की तो २००० आणि २००६ साली छोटा शकीलच्या घरी गेला होता मात्र २००६ नंतर त्याच्याशी संपर्क नाही. कराचीमधल्या क्लिफ्टनमधील गाजी शाह पिर मजारच्या बाजूला छोटा शकील राहतो असे सलीम फ्रुटने ईडीला सांगितले. सलीम फ्रुटने ईडी चौकशीदरम्यान सांगितलं की दाऊद भारत सोडून पळाल्यानंतर त्याची बहीण हसीना पारकर सगळे व्यवहार सांभाळत होती.
हे ही वाचा:
मुस्लिम कधी दाखवणार मनाचा मोठेपणा?
‘हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता’
सिंहाच्या पिंजऱ्यात माणसाने टाकला हात आणि….
दाऊदच्या नावाचा दबदबा असल्याने हसीना पारकरला लोक घाबरायचे त्यामुळे ती सांगेल ती कामे ऐकली जायची. हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी अनेक बेकायदेशीर काम सुरू केली होती. सलीम पटेल हा वादग्रस्त प्रॉपर्टी डिलिंगमधून पैसे कमवत असायचा ज्याचा हिस्सा हसीना पारकरलाही जायचा. दाऊद भारतातून फरार झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टी हसीना पारकर सांभाळत होती, मात्र ती तपासयंत्रणांनी जप्त केली असा जबाब सलीम फ्रुटने ईडीला दिला.