जीएसटी परतावा १७५ कोटींचा घोटाळा, विक्रीकर अधिकऱ्यासह १६ कंपन्यांवर गुन्हा दाखल

१६ कथित कंपन्यांनी बोगस कागदपत्रे आणि भाडे करारपत्राच्या आधारे जीएसटी क्रमांक मिळविला

जीएसटी परतावा १७५ कोटींचा घोटाळा, विक्रीकर अधिकऱ्यासह १६ कंपन्यांवर गुन्हा दाखल

१७५ कोटी रुपयांचा विक्रीकर (जीएसटी) परतावा घोटाळा प्रकरणी विक्रीकर अधिकाऱ्यासह १६ कथित कंपन्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या विक्रीकर अधिकाऱ्याने कंपनीच्या कागदपत्रांची शहानिशा कर परतावे अर्ज मंजूर करून संगनमताने गुन्हा केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर लावण्यात आला आहे.

अमित लाळगे असे या विक्रीकर विभागाच्या अधिकारी यांचे नाव आहे.विक्री व सेवाकर विभागाचे कार्यालय मुंबईतील माझगाव या ठिकाणी असून अमित लाळगे हे त्या ठिकाणी विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत होते.२०२१ ते २०२२ या काळात घाटकोपर विभागाचे नोडल अधिकारी म्हणून लाळगे यांना जवाबदारी देण्यात आली होती. या काळात १६ कथित कंपन्यांनी बोगस कागदपत्रे आणि भाडे करारपत्राच्या आधारे जीएसटी क्रमांक मिळविला होता.

या कंपन्यांनी शासनाला कुठलाही कर (जीएसटी) न भरता कर परतावा ( जीएसटी रिटर्न) करण्यासाठी ३९ अर्ज वस्तू विक्री व सेवाकर विभागाकडे केले होते. विक्रीकर अधिकारी लाळगे यांनी या अर्जाची जाणूनबुजून कोणतीही शहानिशा न करता तसेच जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम मध्ये करदाते हे बनावट असल्याचे दिसत असताना देखील विक्रीकर अधिकारी अमित लाळगे यांनी या अर्जाला मंजुरी दिली, तसेच आपल्या पदाचा गैरवापर करून करदाते यांच्याशी संगनमत करून कट रचला तसेच स्वतःच्या आणि १६ कथित कंपनीच्या फायद्यासाठी कंपन्यांच्या खात्यात १७५ कोटी ९३ लाख १२हजार ६२२ रुपयांचा कर परतावा वितरित केला.

हे ही वाचा:

परकीय चलन हस्तांतरण व्यावसायिकाची २५ हजार डॉलरना फसवणूक

रामलल्लाची मूर्ती कठीण कसोटीतून साकारली

आता एसआयटीची गरज काय?

कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या; फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट

विक्रीकर अधिकारी लाळगे यानी केलेल्या गैरव्यवहार हा वरिष्ठ जीएसटी अधिकारी यांच्या लक्षात येताच लाळगे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी समिती गठीत करून तपास सुरू करण्यात आला. लाळगे यांनी केलेल्या या घोटाळ्या संदर्भात पुरावे तसेच १६ कंपन्यांशी केलेले गैरव्यवहार समितीच्या तपासात समोर आले. या घोटाळ्यात दोषी आढळून आलेले लाळगे आणि १६ कथित कंपनीविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रीकर अधिकारी अमित लाळगे आणि १६ कथित कंपनी विरोधात फसवणूक,बोगस दस्तावेज तयार करणे, कट रचणे तसेच भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केला आहे.

Exit mobile version