किरकोळ बाजारात महागड्या फोनची विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याने तीन वर्षात बनावट कागद पत्राच्या साहायाने ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पार्क साईट पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
एक खासगी कंपनी लॅपटॉप, मोबाईलचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेयर प्रॉडक्ट्स विक्री व वितरण करण्याचे काम करते अशी तक्रार सेल्स विभागाचे जनरल मॅनेजर पदावर असलेल्या ४८ वर्षीय तक्रारदारांनी पोलिसांना केली. कंपनी हे प्रॉडक्ट्स रिलायन्स रिटेल लि. कंपनीला सुमारे १५ ते २१ दिवसाच्या क्रेडिटवर विक्री करत करायची.
हे ही वाचा:
राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर
शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त
पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न
असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर
सेल्स मॅनेजर मनिष पुजारी याच्याकडे रिलायन्स कंपंनीने ऍपल कंपनीच्या वस्तू, मोबाईल फोन, घड्याळ अशा प्रोडक्ट्सची जबाबदारी दिली होती. कंपनीने केलेल्या तपासाअंती विक्री करण्यात आलेल्या १ हजार ८५० आयफोन्सचे ११ कोटी १३ लाख रुपयांचे येणे बाकी असल्याचे दिसले. कंपनीकडून रिलायन्स कंपनीकडे विचारण्यात आले असता कंपनीने कोणतेही थकबाबी नसल्याचे स्पष्ट केले. तक्रारदार कंपनीने केलेल्या तपासणीमध्ये १० कोटी ६० लाखाचे १ हजार ७१० आयफोन्स रिलायन्स रिटेल लि. कंपनीला मिळाले नसल्याची बाबही समोर आली आहे.