दिल्लीमधील साक्षी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता.आरोपी साहिलने चाकूने डोक्यावर चाकूने सपा-सप वार करत साक्षीची हत्या केली होती.या संबंधित पोलिसांनी अंतिम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.या घटनेचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये साहिल सतत वार करताना दिसत होता. १६ वर्षांच्या साक्षीला लोकांच्या समोर चाकूने भोसकून ठार करणार्या साहिलचा पोलिस तपास पूर्ण झाला आहे. आता साक्षीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. पोलिसांनी ६४० पानांचे अंतिम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध शाहबाद डेअरी मर्डर प्रकरणात आज दिल्ली पोलिसांनी आरोपी साहिलविरुद्ध अंतिम आरोपपत्र दाखल केले. २० वर्षीय आरोपी साहिलने साक्षीची दिल्ली येथे हत्या केली. साक्षीवर २१ हून अधिक वेळा निर्दयीपणे हल्ला केला. यावरही तो थांबला नाही खाली पडलेल्या दगडाने ठेचून मारले. हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमधून अटक केली होती. गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी रिठाला येथून हस्तगत केला होता.
हे ही वाचा:
रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण
समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ
साक्षीच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात देशातील विविध भागात हिंदूत्ववादी संघटना आंदोलन करत होते.आरोपी साहिलला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही होत होती.आरोपी साहिलने सर्व मर्यादा पार करत साक्षीवर २१ पेक्षा जास्त वार करत तिची हत्या केली. रस्त्याच्या मधोमध आरोपीने तरुणावर चाकूने हल्ला केला, यावेळी तेथे उपस्थित असलेले अनेकजण मूक प्रेक्षक बनून हा प्रकार पाहत राहिले. कोणीही धाडस दाखवून साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. घटने संबंधीत पोलिसांनी ६४० पानांचे अंतिम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.लवकरच न्याय मिळेल अशी कुटुंबीयांची अपेक्षा आहे.