‘साक्षी साहिलचा उल्लेख करायची, आम्ही तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो’

वडिलांनी दिला पोलिसांना जबाब

‘साक्षी साहिलचा उल्लेख करायची, आम्ही तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो’

नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात अल्पवयीन मैत्रिणीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. २० वर्षांच्या साहिल या आरोपीने साक्षीच्या पोटात २१ वेळा चाकू खुपसून आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली होती. या संदर्भात साक्षीच्या वडिलांनी पोलिसांनाही जबाब दिला आहे.

 

साक्षी गेल्या वर्षभरापासून साहिलची मैत्रीण होती. मात्र तिच्या बोलण्यात सारक्षा साहिलचा उल्लेख येत असे. तिचे कुटुंबीय साक्षीला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होते. ‘माझी मुलगी आमच्यासमोर सातत्याने साहिलचा उल्लेख करत असे. आम्ही तिला सतत सांगायचो. तू अजून लहान आहेस. तू या क्षणी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही जेव्हा जेव्हा तिला याबाबत समजवायचो तेव्हा तेव्हा ती रागावायची आणि तिची मैत्रीण नितूकडे जायची,’ असे साक्षीच्या वडिलांनी सांगितले.

हे ही वाचा:

शिवतीर्थ हा गप्पांचा फड का बनलाय?

कुस्तीगीरांच्या आखाड्यात उतरले राज ठाकरे

आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार…शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

कुस्तीगीरांच्या आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची नाराजी

गेल्या १० दिवसांपासून साक्षी नितूसोबत राहात होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले. ‘मी त्या रात्री घरीच होतो. तेव्हा साक्षीची मैत्रीण नितू आमच्याकडे आली आणि तिने आम्हाला सांगितले की, साहिल नावाच्या मुलाने साक्षीची चाकू आणि दगडाने हत्या केली आहे. मी जेव्हा नितूसोबत शाहबाद डेअरी भागातील बी ब्लॉकमध्ये पोहोचलो तेव्हा साक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती,’ असे साक्षीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

 

साक्षीच्या वडिलांनी सांगितले की, साहिल आणि साक्षीमध्ये हत्येच्या आदल्या दिवशीही वाद झाला होता. साक्षीच्या वडिलांनी साहिलचा कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version