साकीनाका, अंधेरी येथे घडलेल्या अत्यंत घृणास्पद अशा बलात्कार प्रकरणातील आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सदर आरोपीने गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितला आहे आणि त्याने गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्हाला सबळ पुरावे मिळाले आहेत, त्यानुसार आम्ही सगळा घटनाक्रम नोंदवला आहे. घटनास्थळावर पीडित महिला केव्हा व कशी आली. आरोपी तिथे कधी आला आणि पुढे काय झालं हे सगळं घटनाक्रमातून समोर आले आहे.
नगराळे यांनी सांगितले की, या गुन्ह्यासाठी आपण विशेष वकील नेमण्यात आले आहेत. वकील राजा ठाकरे हे आता या प्रकरणात न्यायालयीन लढा देतील. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने या गुन्ह्यात अट्रोसिटी कायदा लावण्यात आला आहे. आरोपिकडे जे प्रमुख हत्यार होते तेही आम्ही जप्त केलेले आहे. काल महिला आयोगाचे केंद्राचे सदस्य आले होते, त्यांनी आमच्याशी चर्चा केली. या गुन्ह्याची चार्जशीट आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये दाखल करणार आहोत.
हे ही वाचा:
अनिल परबांच्या ‘त्या’ अनधिकृत कार्यालयावर पडणार हातोडा!
कधी मिळणार आहे, चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत?
साकीनाका घटनेची पुन्हा आठवण; जावयाने केली सासूची निघृण हत्या
तिला तब्बल दीड लाखाला पडली औषधे
पोलिस आयुक्त नगराळे म्हणाले की, सगळा तपास सुरू १५ दिवसात पूर्ण होईल. अरुण हलदर यांनी घटनास्थळी भेट घेऊन सगळी माहिती जाणून घेतली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक झाली असून यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे.
पीडित महिलेसाठी ज्या शासकीय योजना आहेत त्यातून त्वरित मदत देण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबियांना तातडीने २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. पोलिसांनी जी तात्काळ कारवाई केली आणि तपास केला त्याचेही त्यांनी कौतुक केले.