26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामामुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन इसिस महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन इसिस महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख

पडघ्यात शिजत होता कट

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मॉड्युल उध्वस्त केले आहे. ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घालण्यात आलेला संघटनेचा प्रमुख साकीब नाचनसह १५ जणांना ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गावातून अटक करण्यात आली आहे.

या छापेमारी दरम्यान एनआयएने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, पिस्तुल, धारदार शस्त्रे, इसिस संबंधी कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या १५ जणांना दिल्ली येथे नेण्यात आले असून पुढील तपास दिल्ली एनआयए कडून करण्यात येत आहे.

शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने राज्यातील इतर तपास यंत्रणेच्या मदतीने कर्नाटक, पुणे, ठाणे, मीरारोड आणि पडघा-बोरिवली या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती.या छापेमारीपैकी सर्वात मोठी कारवाई भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली या ठिकाणी करण्यात आली आहे.

पडघा- बोरिवली या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान एनआयए अटक करण्यात आलेल्या १५ जणांपैकी साकीब नाचन हा मुख्य संशयित आरोपी आहे. २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साकीब नाचन याला पडघ्यातून अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोटात साकीबला दोषी ठरवून १० वर्षाची शिक्षा सुनावली होती.१० वर्षाची शिक्षा भोगून २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आलेल्या साकीब नाचन याने पुन्हा दहशतवादी कारवाया करण्यास सुरुवात केली होती अशी माहिती समोर येत आहे.

सिमी संघटनेवर बंदी आल्यानंतए संशयित दहशतवादी साकीब नाचन हा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'(इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होऊन महाराष्ट्राचा प्रमुख नेता बनला होता.

एनआयएच्या तपासा नुसार,साकीब नाचन सह इतर संशयित आरोपी हे त्यांच्या परदेशी हँडलरच्या निर्देशानुसार कार्यरत होते. आयएसआयएसच्या हिंसक आणि विध्वंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी, आयईडी बनविण्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक

अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष

गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाविरोधात अमेरिकेकडून नकाराधिकार

आठ हजार कोटी चार महिन्यात खर्च कसे करायचे?

एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की आरोपी, इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते, जिथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता. हिंसक जिहाद, खिलाफत, इसिसचा इत्यादी मार्गाचा अवलंब करून, आरोपींनी देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ठाण्यातील पडघा हे गाव ‘मुक्त क्षेत्र’ आणि ‘अल शाम’ म्हणून घोषित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पडघा तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते. मुख्य आरोपी आणि इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचा नेता आणि प्रमुख साकिब नाचन हा प्रतिबंधित संघटनेत सामील झालेल्या व्यक्तींना ‘बयथ’ (इसिसच्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देखील देत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

एनआयए मागील काही महिन्यांपूर्वी इसिस चे पुणे मॉड्युल उध्वस्त करून साकीब नाचनचा मुलगा शमील नाचन,नातेवाईक अकिब नाचन सह जुल्फिकार अन्सारी यांना पडघा येथून अटक केली होती. तसेच पुण्यातून काही संशयितांना अटक करून मोठा कट उधळून लावला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा