एका हिंदू धर्मीय बलात्कार पीडितेला तिच्यावर अत्याचार करणाऱ्याशीच निकाह करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच, पीडितेला तिचा धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
पीडितेशी लग्न केल्यानंतर तिला पाच महिन्यांचा गर्भ मुंबईतील रुग्णालयात पाडण्यात आला. ही पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. ती बहारिनमध्ये सात वर्षे काम करत असताना तिची पहिल्यांदा आरोपीशी भेट झाली. या आरोपीचे नाव सैफुद्दीन असून तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. आरोपीची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि त्याच्या कुटुंबीयांवर महिलेचा हुंड्यासाठी छळ करणे, हिंदूधर्मीय महिलेला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे आणि अन्य प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या दोघांची बहारिनमध्ये भेट झाली होती. ‘एके दिवशी त्याने माझ्यावर बहारिनमध्ये बलात्कार केला. या प्रकरणी मी तिथे तक्रार दाखल केली होती. तिथे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या बलात्कारातून मी गर्भवती झाले. मी गर्भवती असल्याने सैफुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझ्यावर ही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला. त्यांनी माझ्यावर धर्मांतरणासाठीही दबाव आणला. त्यानंतर १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी मी मुस्लिम कायद्यानुसार सैफुद्दीनशी विवाह केला. मात्र पाच महिन्यांची गर्भवती असताना तो मला वैद्यकीय सल्ल्यासाठी मुंबईला घेऊन आला. तिथे त्याने मला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गुप्तपणे माझा गर्भपात केला,’ असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
हे ही वाचा:
उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!
कन्हैय्या कुमारला मारणाऱ्यांना कोणताही पश्चात्ताप नाही!
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
त्यानंतर पीडितेला आरोपीच्या कर्नाटकमधील बीडार गावात आणण्यात आले. तिथे सैफुद्दीनचा मोठा भाऊ, त्याची प्रेयसी मोनिका आणि अन्य कुटुंबीयांनी तिचा छळ केला. पोलिसांनी सैफुद्दीनसह अन्य जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सैफुद्दीन सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.