पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात काही साधूंना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करून या घटनेची तुलना पालघरच्या साधूंच्या हत्येशी केली आहे. तृणमूल काँग्रेसने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘“ममता बॅनर्जींच्या बहिरेपणाची लाज वाटते! हे हिंदू साधू तुमच्या दखलेस पात्र नाहीत का?,’ अशी टीका पश्चिम बंगालच्या भाजपने ‘एक्स’वर केली आहे. त्यावेळी भाजपने या हल्ल्याची ३० सेकंदाची व्हिडीओ क्लिप यात टाकली आहे. त्यानंतर भाजपचे आयटी विभाग प्रमुख णित मालविय यांनीही शुक्रवारी यावर प्रतिक्रिया देऊन या घटनेची तुलना सन २०२०मध्ये पालघरमधील जमावाने साधूंना ठेचून मारलेल्या घटनेशी केली आहे.
मकरसंक्रातीनिमित्त गंगासागरला जाणाऱ्या साधूंना अशा प्रकारे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित गुन्हेगारांनी मारहाण केली. पश्चिम बंगालमधील पुरुलिया भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे,’ असे मालवीय यांनी म्हटले आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणे हा गुन्हा आहे. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात शहाजहां शेखसारख्या दहशतवाद्यांना संरक्षण मिळते. तर, साधूंना असे ठेचले जाते,’असा दावा मालवीय यांनी केला. बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनीही या हल्ल्याप्रकरणी ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा:
मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह मिळाला
संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
अरविंद केजरीवालांना ईडीचं चौथं समन्स
२०२०मधील पालघरमध्ये जमावाकडून साधूंची हत्या
१६ एप्रिल, २०२० रोजी जमावाने मुले चोरणारी टोळी समजून दोन साधूंना मारहाण केली होती. हे साधू सुरत येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात होते. मात्र पालघरमधील गडचिंचले या आदिवासी गावातील गावकऱ्यांनी त्यांची गाडी रोखून त्यांना दगड आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. त्यात दोन साधूंचा जीव गेला होता. या प्रकरणी १००हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.