31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाअनिल परब तो गियो ...

अनिल परब तो गियो …

सदानंद कदम यांनी उघडली कुंडली

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सदानंद कदम यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजार करण्यात आले आहे.

साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकारणी सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याकडून कडून विभास साठे यांच्या खात्यात एक कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे ईडीच्या आजच्या सुनावणीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आता एड अनिल परब यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सदानंद कदम याना अटक केल्यानंतर त्यांना शनिवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने त्यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सुनावणीच्या वेळी सदानंद कदम यांच्या वकिलांनी या सर्व कारवाईला विरोध करत ही कारवाई कशी चुकीची आहे असा युक्तिवाद केला. ईडीने सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. सुनावणीच्यावेळी सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. कदमांनी चार वेळा चौकशीत जवाब बदलला असे ईडीने म्हटले आहे. त्यामुळे १४ दिवसांची कोठडी द्या अशी मागणी ईडीने केली होती. पण सदानंद कदम यांना ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगला साई रिसॉर्टमध्ये बदलण्याचा निर्णय परबांचा होता असेही ईडीने डीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले

बांधकाम ५४ लाख रुपयांचे ऑन रेकॉर्ड ३.५ कोटी रुपये

या सगळ्या प्रकरणामध्ये सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्या सांगण्यावरून ८० लाख रुपायांचा व्यवहार विभास साठे यांच्याबरोबर केला असं ईडीनं म्हटलं आहे. साई रिसॉर्टचे बांधकाम ५४ लाख रुपयांमध्ये करण्यात आले. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत ३.५ कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे बेकायदेशीपणे कुठून आले याचा तपास आम्हाला करायचा आहे. साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास करायचा आहे असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.

राजकीय बाळाचा वापर करून परवानग्या

या पार्श्वभूमीवर ईडीकडून आणखी काही जणांना समन्स बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनिल परब यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. अनिल परब हेच साई रिसॉर्टचे मालक आहेत. त्यांनीच आपल्या राजकीय बाळाचा वापर करून कुठेतरी दबाव टाकून दस्तऐवजांमध्ये फोर्जरी करून साई रिसॉर्ट संदर्भातील सर्व परवानग्या मिळवल्या होत्या.

साई रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात आहे. या सगळ्या प्रकारणांध्ये गैर व्यवहार झालेले असून सदानंद कदम यामध्ये प्रमुख आरोपी आहेत आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ऑईल परब यांच्या सांगण्यावरून आपण व्यवहार केल्याचे कदम यांनी सुनावणीच्या वेळी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा