27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामाप्रॉव्हिडंट फंड साठी केला संघर्ष, पण मृत्युनंतरच खात्यात जमा झाली रक्कम!

प्रॉव्हिडंट फंड साठी केला संघर्ष, पण मृत्युनंतरच खात्यात जमा झाली रक्कम!

Google News Follow

Related

हेतराम पाल या शेतकऱ्याने आपल्या भविष्यनिर्वाह निधीतील रकमेसाठी काही वर्षे संघर्ष केला, धरणे धरले पण जिवंतपणी त्याला ही रक्कम मिळालीच नाही. मात्र मृत्युनंतर त्याच्या खात्यात ही रक्कम अखेर जमा केली गेली. हेतराम पाल या शेतकऱ्याची ही दुर्दैवी कहाणी आहे.

पाल हे शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील निवृत्त कर्मचारी होते. निवृत्तीनंतर तीन वर्षे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. उपोषणे, आंदोलने केली, धरणे धरले पण त्याचा फारसा उपयोग झाली नाही. संघर्ष करता करता त्यांची ताब्येत खालावली व त्यांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. पण अखेरपर्यंत त्यांना निधी मिळाला नाही.
त्यांना मृत घोषित केल्यानंतर काही तासातच अधिकाऱ्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून त्यांच्या पत्नीच्या बँकेत तीन लाख जमा केले. उर्वरित सात लाख लवकरच मिळतील असे आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिले.

४० वर्षांहून अधिक काळ पाल हे उजनी येथील बुडौन जवळील एका गावात ” शेतकरी सहकारी साखर मिल ” मध्ये कार्यरत होते. त्यांच्या आजारपणामुळे बिघडलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पैशाची गरज होती. राजीव कुमार रस्तोगी मिलचे व्यवस्थापक म्हणाले, त्यांच्या जन्मतारखेत काही त्रुटी असल्यामुळे विलंब लागला. पण त्यांच्या कुटुंबीयांनी याचा इन्कार केला.

हे ही वाचा:

मंदिर तोडले कट्टरवाद्यांनी, दंड भरतोय हिंदू समाज

परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती

नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

 

हेतराम यांनी ४० वर्षे मिलमध्ये सेवा बजावली असली तरी निवृत्तीनंतर तीन वर्षे उलटूनही त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे दावे निकाली निघाले नाहीत, असं त्यांचा मुलगा महेश म्हणाला. निवृत्तीनंतर, पाल यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैसे त्यांना भविष्यासाठी उपयोगी पडतील या उद्देशाने त्यांनी बुडौन येथे घर विकत घेण्यासाठी त्यांची बहुतांश बचत खर्च केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा