सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर

जामिनासाठी केलेल्या अर्जातील वाझेचे विधान

सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर

अँटिलिया बॉम्बस्फोटकांप्रकरणी आणि त्यात झालेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणी जामीन मिळविण्यासाठी सध्या या प्रकरणातला प्रमुख आरोपी सचिन वाझे प्रयत्नशील आहे. जामिनासाठी त्याने जो अर्ज केला आहे त्यात त्याने चक्क मुकेश अंबानी यांच्याबद्दल आपल्याला अतीव आदर आहे, असे म्हटले आहे.

एकीकडे विरोधकांकडून अदानी अंबानी यांच्यावर टीका केली जात असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महत्त्वाची जबाबदारी पोलिस दलात सोपविण्यात आलेल्या सचिन वाझेला मात्र अंबानी हे आदर्श वाटू लागले आहेत. तो म्हणतो की, भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे.

सचिन वाझेने आपल्या अर्जात म्हटले आहे की, एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्याला हे निश्चित ठाऊक आहे की, अंबानी आणि त्यांचे कुटुंबियांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला धमकावण्यासाठी कमी दर्जाच्या आणि मोठा स्फोटही होऊ शकत नाही अशा स्फोटकांची भीती दाखविणे यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. त्यामुळे अशी हास्यास्पद गोष्ट आपण स्वप्नातही केली नसती.

हे ही वाचा:

म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला

महापूरे लव्हाळे जाती झाडे तिथेच राहाती…भूत बंगल्यांचा पहीला बळी!

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

रशियात ज्वालामुखी फुटला, २० किमी उंचीपर्यंत राखेचे ढग उसळले

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या प्रशस्त घराखाली ठेवण्यात आली होती. ४ मार्चला या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली.

या याचिकेत असेही म्हटले आहे की, जी चिठ्ठी तिथे सापडली त्यात नीता भाभी, मुकेश भैय्या अँड फेमिली असे म्हटले होते त्यातील या व्यक्ती सापडलेल्या नाहीत. ही नावे नीता अंबानी, मुकेश अंबानी यांची आहेत असे म्हटले तर त्याचे पुरावे नाहीत.

याचिकेत असेही नमूद केले आहे की, दोन वर्षे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी यांचे त्यांना धमकावण्यात आले असे कोणतेही जबाब नोंदविलेले नाहीत.

Exit mobile version