सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणातील प्रमुख संशयित सचिन वाझे याच्या हृदयात ९० टक्के ब्लॉकेजेस असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे याच्या वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे.

सचिन वाझे याच्या प्रकृतीला धोका असल्याचे सांगत त्याचे वकित आबाद पोंडा यांनी विशेष न्यायलयात सचिन वाझेला वैद्यकिय मदत मिळावी अशी मागणी केली आहे. न्यायालयाने देखील वैद्यकिय तज्ञांचा अहवाल मागवला आहे. वाझेच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्याने वेळीच उपचार न केल्यास त्याच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे. या बाबत एनआयए कोर्ट काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

संजय राऊतांना समज द्या, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

उद्धव ठाकरे, पाल्हाळिक बोलणे बंद करा

गेल्याच आठवड्यात सचिन वाझेची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रात्री सुमारे साडे दहा वाजता त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

सचिन वाझेला कोर्टात दाखल करणार

सचिन वाझेची एनआयएकडची कोठडी शनिवारी संपत आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. तिथे एनआयए त्याची कोठडी वाढवून मागते का आणि कोर्टाकडून त्याला मंजूरी मिळते का याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version