अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला घेऊन एनआयएच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कळवा असा लोकल प्रवास केला. एनआयएच्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज लागले. त्याच्या सहाय्याने वाझेने सीएसएमटी ते कळवा असा प्रवास केला असल्याचे उघड होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात सचिन वाझे फलाटाकडे जाताना दिसतो. त्यामुळे एनआयएच्या टीमने या घटनेचे देखील रुपांतर केले.
हे ही वाचा:
लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार- राज ठाकरेंचा सवाल
न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नावावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर
गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे
रात्री सव्वाअकराच्या सुमारास वाझेसह एनआयएची टीम बाहेर पडली. त्यांनी सीएसएमटीच्या फलाट क्र. ४-५ वर त्यादिवशी नेमकं काय घडलं याची माहिती त्यांनी घेतली. त्यादिवशी वाझेने कळव्यापर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर वाझेला घेऊन रात्री एनआयएने कळव्यापर्यंत प्रवास केला आणि ४ मार्चच्या रात्रीच्या घटनेचे नाट्यरुपांतरण केले. त्यानंतर हे सर्व जण पुन्हा एनआयए कार्यालयात रात्री उशिरा पोहोचले.
यापुर्वी एनआयएने सचिन वाझेला घेऊन रात्री अँटिलियासमोर काय घडले त्याचे नाट्यरुपांतर केले होते. त्यावेळी वाझेला पीपीईकीट घालून चालायला लावण्यात आले होते. त्याचे चित्रीकरण देखील करण्यात आले.
बाईकची एन्ट्री
या प्रकरणात एनआयएकडून अनेक गाड्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या प्रकरणात एका बाईकचाही समावेश झाला आहे. सचिन वाझेने ही बाईक काही वर्षांपूर्वी वापरली असल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक दमणमधून जप्त करण्यात आली.