वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सचिन वाझे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ते राहत असलेल्या साकेत सोसायटी मधून डीव्हीआर मिळवल्याची माहिती मिळत आहे. वाझे यांनी हे डीव्हीआर ताब्यात घेऊन नष्ट केल्याचे समजत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी या विषयात अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी, मुंबई मधील सीआययु युनिटचे प्रमुख राहिलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वेळोवेळी आपल्या पदाचा गैरवापर केला. आपल्या पदाचा वापर करूनच त्यांनी ते राहत असलेल्या साकेत इमारतीतून डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आणि सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि नुसते मिळवलेच नाही तर ते नष्ट देखील केले. वाझे यांचे हे कृत्य बेकायदेशीर आहे.
हे ही वाचा:
पवारांच्या पत्रकार परिषदेत नव्हता जोर, ओरडले फक्त मोर
मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार
कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली
वाझे यांनी त्यांच्या सीआययु युनिट मधील अधिकाऱ्यांच्या मार्फत साकेत सोयटीला डीव्हीआर सादर करण्यासाठी नोटीस पाठवली होती. तपास करण्यासाठी हे डीव्हीआरे मागण्यात आले होते. पण हे डीव्हीआर ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आले आहेत. या माहितीमुळे अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती? वाझेच वापरात होते स्कॉर्पिओ?
अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ गाडी आधी चार महिने वाझे यांच्या ताब्यात होती आणि वाझे ती वापरत असल्याची माहिती या आधीच समोर आली आहे. अशातच स्कॉर्पिओ हे वाझेच वापरात होते का? त्याचेच फुटेज नष्ट करण्यात आले का? वाझे यांच्याच सांगण्यावरून मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीची खोटी तक्रार केली होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.