शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच

मुंबई उच्च न्यायालयाने दिला निर्णय

शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच

शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तब्बल दोन वर्षांनी सचिन वाझेला वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला करण्यात आला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यानेही जामिनासाठी याचिका केली होती.

सचिन वाझे हा गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात होता. वाझे याच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातही तो आरोपी आहे. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात सचिन वाझे याला विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्याचा मुक्काम तुरुंगात होता. मे महिन्यात त्याने पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.

अनिल देशमुखांनी दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सचिन वाझेने केला होता. या आरोपांप्रकरणी आता उच्च न्यायालयाने वाझेला जामीन दिला आहे. जामिनाच्या अटीशर्ती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

हे ही वाचा..

उज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाणार

आरजी कार पीडीतेच्या वडिलांनी मागितली अमित शहांकडे वेळ

हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारला!

वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली

अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेने केला होता. त्यानुसार सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम सध्या तरी कारागृहातच असणार आहे.

Exit mobile version