25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामामंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

Google News Follow

Related

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मंत्रालय या ठिकाणी दुपारी १२:४० वाजता अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावरून प्रचंड खळबळ उडाली. हा कॉल अफवा पसरवण्याच्या हेतूने केला गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, अखेर तो कयास खरा ठरला. या घटनेमुळे अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. आधीच महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी लिहिलेला लेटरबॉम्ब, त्यात परिवहन विभागातील अधिकाऱ्याने तेथील वसुलीबाबत लिहिलेले स्फोटक पत्र यामुळे राज्य सरकार धास्तावलेले असताना या घटनेमुळे आणखी तारांबळ उडाली.

हे ही वाचा:

आता बस झालं…किमान वेतन द्या, दुकाने उघडा

वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा

लस खरेदीत पालिकेची दमछाक; खासगी रुग्णालयांनी टाकले मागे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज अधिक- जयंत नारळीकर

बॉम्बशोधक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मंत्रालयातील कानाकोपरा तपासला गेल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. या तपासानंतर मंत्रालयात आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नाही. नागपुरातल्या सागर काशिनाथ मंदरे या व्यक्तीने हा फोन केल्याचे आढळून आले. १२ फेब्रुवारी २०२० रोजी या इसमाने आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि मुख्य सचिवांना अटक करण्याची मागणी केली होती. सदर तरुण मानसिकरित्या स्वस्थ नसल्याची माहिती आहे.

काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याचे प्रकरण अजूनही चर्चेत आहे.त्या घटनेत अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचेही उघड झाले होते. त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. त्या प्रकरणात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यापाठोपाठ पोलिस अधिकारी रियाझ काझीलाही पकडण्यात आले. हे दोन्ही अधिकारी नंतर बडतर्फ झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा