पोलिसांनी अटक केलेली रुबिना विकत होती ‘म्याव म्याव’

पोलिसांनी अटक केलेली रुबिना विकत होती ‘म्याव म्याव’

Drug syringe and cooked heroin on spoon

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने मुंबईतील वांद्रे येथून एका महिलेला अटक केली आहे. सध्या रुबीना शेख हिचे नाव चांगलेच चर्चेत आहे. रुबीना म्हणजे तिच महिला जिने अंमली पदार्थ विकून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. एमडी हा अंमली पदार्थ विकून तब्बल १२ कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. हा अमली पदार्थ तरुणांमध्ये म्याव म्याव म्हणून लोकप्रिय आहे.

रुबिना नियाज शेख असं या अमली पदार्थ तस्कर महिलेचे नाव असुन मालेगावमध्ये तीन बंगला, मुंब्रा येथे फ्लॅट, कुर्ला येथे दुकान, वांद्रे येथे घर आणि माहिम कॉजवे येथे दोन खोल्या आहेत. रुबिना ही अमली पदार्थ तस्कर दुनियेतील टोळींची सेकंड-इन-कमांड आहे. एनसीबीने तिच्याकडून ८० लाख रुपये आणि रुपये ३० लाख किमतीचे सोने देखील जप्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी रुबीना मुंबईतून पळून गेली होती. परंतु एनसीबीने रुबीना शेखला गुजरातमधील उंझाजवळील मीरा दातार येथून अटक केली. मात्र तिचा बॉस निलोफर सांडोळे अजूनही फरार आहे.

हे ही वाचा:

…आणि त्याने थेट कुकरशी लग्न केले

इराण-अझरबैजान युद्धाची ठिणगी पडली?

पुढील वर्षापासून ‘पीओपी’ मूर्ती बंद होणार?

फुटबॉलपटू मेस्सीच्या खोलीत शिरले चोरटे आणि…

मुंबईत झोपडपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर ही विक्री रोखण्यासाठी मोठे छापे घातल्यानंतर शेख आणि सांडोळे यांची नावे समोर आली. शेख हा केजीएन दर्गा लेन, वांद्रे येथील रहिवासी आहे. अंमली पदार्थांची तस्करी करून मिळवलेल्या पैशातून तिने तिथे घर खरेदी केले आहे. या शेखसाठी सुमारे ४० अंमली पदार्थ तस्कर काम करतात. ते मुख्यतः माहीम, वांद्रे, कुर्ला, कसाईवाडा, मुंब्रा आणि भिवंडी येथे सक्रिय आहेत, असा खुलासा तपासातून झाला आहे.

रुबीना ही गेल्या दहा वर्षांपासून व्यवसायात होती. मालेगावमधील तिझे प्रशस्त आणि आलिशान बंगल्यांची किंमत 2 कोटींपेक्षा जास्त आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने कुर्ला येथे ५० लाख रुपयांना दुकान विकत घेतले होते.
रुबीनाला अटक केली तेव्हा एनसीबीने तिच्याकडून रोख, सोन्याचे दागिने आणि १०९ ग्रॅम म्याव म्याव हे अंमली पदार्थ जप्त केले. प्रकरणात आणखी दोन जणांना अटक केली आहे. रुबीना शेख आणि सांडोळेची ते राहत असलेल्या भागात इतकी दहशत आहे की, त्यांच्या परवानगी शिवाय भागात त्यांच्या मर्जीशिवाय कोणी साधे घरे देखील विकून शकत नाही. रुबीनाचे वडील भू – माफिया असून त्यांचे चोरांचे मोठे नेटवर्क आहे. मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधायच्या आणि त्या विकायच्या हे काम ही टोळी करायची. माहीम दर्ग्याजवळ अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थ विकल्याच्या प्रकरणात एनसीबीने सांडोळेला आरोपी बनवले आहे.

Exit mobile version