हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी

अंजय्या आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक केली असून इतर फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी

सेवानिवृत्त मंडल परिषद विकास अधिकारी (एमपीडीओ) आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सूत्रधार बीआरएस या सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

७० वर्षीय नल्ला रामकृष्णैया यांची हत्या रविवारी उघडकीस आली जेव्हा त्यांचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी पाण्याने भरलेल्या खाणीत सापडला. तेलंगणातील जानगाव जिल्ह्यात जमिनीच्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. मृत रामकृष्णैया यांच्या मुलाने यापूर्वीच आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

 

मुख्य आरोपी आणि बीआरएस पक्षाचे नेते जी अंजय्याचा रामकृष्णैयाशी वाद होता आणि जमिनीच्या मुद्द्यावरून रामकृष्णैया यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे त्याच्या मनात याबद्दल राग होता, असे पोलिसांनी सांगितले. रामकृष्णय्या यांना संपवण्यासाठी त्याने एका कॉन्ट्रॅक्ट किलिंग टोळीला नियुक्त केले होते. या टोळीने १५ जून रोजी पोचन्नापेटा येथे रामकृष्णैया यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराना आर्थिक रसद?

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अंधारेच! कायंदे कुणामुळेबाहेर पडल्या हे कळले…

त्यांनी टॉवेलचा वापर करून त्याचा “गळा दाबून” खून केला आणि मृतदेह खाणीच्या तलावात फेकून दिला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी रविवारी अंजय्या आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक केली असून इतर फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रामकृष्णय्या यांनी न्यायालयात आरटीआय अर्ज आणि दिवाणी दावे दाखल केले होते आणि पोचन्नापेट गावातील सरकारी वापराच्या जमिनीशी संबंधित पट्टे (जमीन करार) रद्द करण्यासाठी त्यांनी अंजय्या विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडेही संपर्क साधला होता, ज्यावर अंजय्या यांनी कथित कब्जा केला होता, असा रामकृष्णैया यांचा आरोप होता.

 

यामुळे त्यांच्यात वैयक्तिक वैर निर्माण झाले आणि अंजय्याने रामकृष्णैयाला मारण्यासाठी एका कुख्यात टोळीला हत्येची सुपारी दिली, असे पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी अंजय्या जो सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्याचा पती आहे, त्याने तिरुपती नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला रामकृष्णैयाला संपवण्यासाठी ८ लाख रुपये देण्याची ऑफर दिली. तिरुपतीने हे काम करण्याचे मान्य केले आणि अंजय्याकडून ५० हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. टोळीच्या सदस्यांनी १५ जून रोजी रामकृष्णैयाचे कारमधून अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह खाणीत फेकून दिला, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version